वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थीनी सानिका बादुले हिने माजलगाव येथे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सुंदरराव सोळंके महाविद्यालय माजलगाव आणि कानिफनाथ बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजलगाव येथे विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कनिष्ठ गटातून लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील इयत्ता बारावी कला शाखेतील विद्यार्थिनी सानिका बादुले हिने तृतीय क्रमांक पटकाविला. रोख रक्कम रुपये तीन हजार, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला. नेमका विकास म्हणजे काय या विषयावर सानिकाने प्रभावी वक्तृत्व सादर केले. तिला प्रा. अभिजित सपाटे व प्रा. रत्नमाला पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, प्रदीप चव्हाण, प्रा. सतीश इंगळे, प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर, यशवंत चंदनशिवे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.