वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील ट्रेनिंग प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी मार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देण्यात आली होती. सदर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या. यात सुप्रिया दयानंद फरिदाबादकर या बी. एस्सी तृतीय वर्गातील विद्यार्थिनीची टीसीएस कंपनीत निवड झाली आहे. तिला मिळालेल्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ. सतिश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे, प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी अभिनंदन केले आहे. टीसीएस कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन ट्रेनिंगसाठी म. शि.प्र. चे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर अमरसिंह माळी, ट्रेनर सुमित धानोरे, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. राजाराम निकम व महाविद्यालयाच्या इतर प्राध्यापकांनी सहकार्य केले. आतापर्यंत ट्रेनिंग प्लेसमेंटसेल मार्फत दोन विद्यार्थिनींची टीसीएस कंपनीत जॉबसाठी निवड झाली आहे.