वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने लोहारा शहरात सोमवारी (दि.११) विविध कार्यक्रम घेऊन महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
लोहारा शहरातील महात्मा फुले चौक येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. जयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्ताचे संकलन श्रीकृष्ण रक्त पेढी उमरगा यांनी केले. यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय बिराजदार, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, शंकर जटटे, पं.स.माजी सदस्य चंद्रकांत पाटील, नागणणा वकील, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, नगरसेवक अमिन सुंबेकर, आरीफ खानापुरे, प्रशांत काळे, दिपक मुळे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, जगदिश लांडगे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, विक्रांत संगशेटटी, इकबाल मुल्ला, रौफ बागवान, बाळासाहेब पाटील, शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, महेबुब गवंडी, प्रकाश भगत, दगडु तिगाडे, बाबुराव पवार, बाळासाहेब कोरे, संजय दरेकर, निळकंठ कांबळे, गणेश खबोले, कालिदास गोरे, जे के बायस, यशवंत भुसारे, प्रमोद पोतदार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरी लोखंडे, गगन माळवदकर, राजेंद्र कदम, दयानंद शेवाळे, प्राचार्य शहाजी जाधव, शम्मु भोंगळे, हाजी बाबा शेख, ओम पाटील, के.डी. पाटील, लक्ष्मण रोडगे, बळी रोडगे, राजेंद्र माळी, अरुण रोडगे, जयंती उत्सव समीती अध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर, उपाध्यक्ष बजरंग माळी, सचिव श्रीकांत माळी, सहसचिव महेश माळी, कोषाध्यक्ष संदीप माळी, युवा मंच अध्यक्ष सचिन माळी, अमोल माळी, बाळू माळी, ज्ञानेश्वर क्षीरसागर, गणेश माळी, गणेश फुलसुंदर, प्रशांत क्षिरसागर, विष्णू क्षिरसागर, लक्ष्मण क्षिरसागर, शरण फुलसुंदर, विश्वनाथ फुलसुंदर, बालाजी माळी,अशोक काटे, अशोक क्षिरसागर, आदिनाथ फुलसुंदर, गजानन माळी, बंटी माळी, शंकर फुलसुंदर, गणेश वाघमारे, शंकर माळी, शरण फुलसुंदर, शशिकांत माळी, संतोष क्षिरसागर, राहुल माळी, सोमनाथ भोजने, अशोक माळी, संजय काटे आदी उपस्थित होते.