वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार लोहारा तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी (दि.१३) सकाळी १० वाजता लोहारा येथील तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दिवाणी व फौजदारी प्रकरणे, वादपूर्व प्रकरणामध्ये तडजोड करून व निकाली काढणेबाबत तालुका विधी समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (क स्तर) एन. एस. सराफ यांनी आवाहन केले आहे. पक्षकारांनी आपले प्रलंबित तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात यावी व लवकरात लवकर प्रकरण निकाली निघण्याच्या उद्देशाने या लोक अदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, धनादेशाचे प्रकरणे, तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणे मिटवून सर्वच पक्षकारांनी व सुज्ञ नागरिकांनी आपले हेवेदावे विसरून पुढे येऊन सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.