वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक करून पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, त्यापद्धतीने आपणसुद्धा सर्वाना सोबत घेऊन काम करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांनी सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व महाविकास आघाडीचे आभार मानले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, जेष्ठ नेते किशोर साठे, गोविंदतात्या साळुंके, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, जिल्हा कार्यकारणी सदस्य हाजी बाबा शेख, युवक जिल्हा उपाध्यक्ष दादा पाटील, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, शहराध्यक्ष आयुब शेख, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, बहादूर मोमीन, प्रकाश भगत, नवाज सय्यद, बालाजी मेनकुदळे, तालुका कार्याध्यक्ष ऍड. दादा जानकर, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड , संजय जाधव, वैजनाथ कागे, रवी राठोड, लक्ष्मण बिराजदार, दयानंद थोरात आदी उपस्थित होते.
No Result
View All Result
error: Content is protected !!