वार्तादूत – डिजिटल न्यूज नेटवर्क
लोहारा शहरात शनिवारी ( दि. २०) हेल्थ फिट ग्रुपच्या वतीने मोफत बॉडी चेक अप व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १४५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
हेल्थ ग्रुपच्या वतीने लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातील नागरिकांच्या बॉडी चेक अप व हेल्थ गायडन्स साठी पुणे व मुंबई येथील तज्ज्ञांची टीम आली होती. यात पुणे येथील आहार तज्ञ स्नेहल जाधव, वेलनेस कोच निकिता जाधव, अभिमन्यू जाधव, मुंबई येथील स्नेहल भन्साली, सुपरवायझर सागर शिंपी यांचा समावेश होता. या शिबिरात आलेल्या नागरिकांना त्यांच्या शरीरातील चरबीचे विश्लेषण, पोषण आहाराचे महत्व आदी अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात एकूण १४५ जणांनी तपासणी करून घेतली. या शिबिरात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या शिबिरासाठी अक्षता जट्टे, नागेश जट्टे, शामा पाटील, किशोर चौधरी, शहाजी जाधव, सविता जाधव, भरत सुतार, गजानन बष्टे आदींनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले.