वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लोहारा शहरातील भटक्या विमुक्त जातीच्या पालावर नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी शनिवारी (दि.१३) पुढाकार घेऊन तिरंगा ध्वज लावला.
हर घर तिरंगा या अभियानाची लोहारा नगरपंचायकडून शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून लोहारा शहरातील भटक्या विमुक्त जातीच्या पालावर तिरंगा ध्वज लावण्यासाठी नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी पुढाकार घेवून स्वस्त: पालावर जाऊन तिरंगा ध्वज लावण्यात आला. या ठिकाणी आकर्षक रांगोळीही काढण्यात आली होती. या भटक्या विमुक्त लोकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होते.
यावेळी तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बिराजदार, नगरसेविका मयुरी बिराजदार, डॉ. हेमंत श्रीगिरे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे, जनकल्याण समितीचे शंकर जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य महेबूब गवंडी, रघुवीर घोडके, चिदानंद स्वामी, राजकुमार स्वामी, उत्तम पाटील, बलू स्वामी, किरण पाटील, कमलाकर मुळे, गणेश काडगावे, प्रेम लांडगे, प्रशांत थोरात यांच्यासह नागरिक उपस्थित होते.