वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील पावणारा गणेश मंडळच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संगीत खुर्ची, उखाणे, रांगोळी कला सादरीकरण आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यात ७५ महिलानी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना मंडळाच्या वतीने नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आले. यावेळी नगरसेविका आरती सतिश गिरी, सारिका प्रमोद बंगले, संगीता किशोर पाटील, आरती ओम कोरे तसेच नगरसेवक विजयकुमार ढगे, अमीन सुंबेकर, श्रीकांत भरारे, दीपक मूळे, हरी लोखंडे व शंकरअण्णा जट्टे आदींची उपस्थिती होती.
यासाठी मंडळाचे अध्यक्ष ओम जट्टे, गौरव तोडकरी, समर्थ वैरागकर, अमित बोराळे, कोंडाप्पा तोडकरी, शुभम तोडकरी, गौरीशंकर जट्टे, प्रसाद जट्टे, ऋषभ तोडकारी, नितीन तोडकरी, दिनेश जायफळे, अजय फुगटे, सचिन तोडकरी, शिवकुमार वैरगकर, रितेश तोडकरी, वैभव जट्टे, स्वप्नील तोडकरी, यश जट्टे, मुन्ना माशाळकर, संतोष जट्टे, पिंटू जट्टे आदींनी पुढाकार घेऊन सहकार्य केले. यावेळी नागरिक उपस्थित होते.