वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोहारा शहरातील हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तहसीलदार संतोष रूईकर यांच्या हस्ते सोमवारी (दि.१५) वाटप करण्यात आले.
शहरातील हायस्कूल लोहारामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळ आधिकारी बरणाळे होते. यावेळी मुख्याध्यापक वसंत राठोड, नगरसेवक प्रशांत काळे, संस्थाध्यक्ष महेबूब फकीर, अँड ,उस्मान मोरवे, चेतन बोडगे, निळकंठ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या वतीने लोहारा हायस्कूलमधील जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांना तहसीलदार संतोष रूईकर यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सादिक फकीर, युसुफ कुरेशी, जाकीर कुरेशी, महादेव धारूळे , सलीम कुरेशी, अलीम बांदार, जिंदाशा फकीर , ज्ञानोबा शिंदे, गोरोबा गाढवे, सद्दाम मुलानी, हाजी बाबा शेख, अब्बास शेख, गोपाळ सुतार, माधव पाटील, विठ्ठल पाटील, सतीश जट्टे , संजय घोडके, सुनील ठेले आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.