वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
लोहारा शहरातील मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे व पाणीपुरवठा सभापती मयुरी बिराजदार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, अभिमान खराडे, अमोल बिराजदार, प्रमोद बंगले, नगरसेवक प्रशांत काळे, अमिन सुंबेकर, विजय ढगे, दिपक मुळे, आयनोद्दीन सवार, हरी लोखंडे, श्रीनिवास माळी, सलीम शेख, महेबूब गवंडी, बाळासाहेब पाटील, दगडू तिगाडे, विक्रांत संगशेट्टी, जयश्री कांबळे, अनुसया थोरात, महानंदा कांबळे, पुष्पा थोरात, सखुबाई शिंदे, अश्विनी वाघमारे, अमोल माटे, तात्या कांबळे, नितीन वाघमारे, विकास घोडके, शैलेश कांबळे, स्वप्नील माटे, सुमित कांबळे, मिलिंद नागवंशी, रोहित शिंदे, राहुल गायकवाड, नीलकंठ कांबळे, दिगंबर कांबळे, बाबा गायकवाड, श्रीकांत कांबळे, प्रशांत थोरात यांच्या सह नागरिक उपस्थित होते.
लोहारा नगरपंचायत कार्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, पाणीपुरवठा सभापती मयुरी बिराजदार, गटनेत्या सारिका बंगले, अर्थ व बांधकाम सभापती गौस मोमीन, नगरसेवक जालिंदर कोकणे, अमीन सुंबेकर, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, अभिमान खराडे, प्रमोद बंगले, बाळासाहेब पाटील, आयुब शेख, ओम कोरे, हाजी बाबा शेख, शब्बीर गवंडी, स्वप्नील माटे, स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे, श्रीशैल्य मिटकरी, गणेश काडगावे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.