वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.११) लोहारा शहरातील आरोही गृह उद्योगाला भेट देऊन पाहणी केली.
लोहारा शहरातील शिवनगर येथे आरोही गृह उद्योगाच्या माध्यमातुन उडीद पापड, ज्वारीचे पापड, तांदुळाचे पट्टी पापड, कुर्ड्या, शेंगदाणा चटणी, शेवाया, तुर दाळ, हरभरा दाळ आदी तयार केले जाते. या गृह उद्योगाला औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित रंजन व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रा. श्रीपर्णा चौधरी यांनी सोमवारी (दि.११) भेट देऊन पाहणी केले. ग्रामीण भागात या पद्धतीचे उद्योग उभे राहिले पाहिजेत. तसेच यातून महिला सक्षम होण्यास मदत होते असे मत व्यक्त करून उद्योगात नवनविन बदल करण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर, सामाजिक कार्यकर्त्या वंदना भगत, प्रा. तौफिक कमाल, आरोही गृह उद्योगच्या सविता बिराजदार, पुजा बिराजदार आदी उपस्थित होते.