Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

विद्युतवाहिनी जवळ वीज पडल्याने लोहारा शहरासह १२ गावांचा वीजपुरवठा खंडित – दुरुस्तीच्या कामानंतर वीजपुरवठा झाला सुरळीत

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उजनी येथून लोहाऱ्याला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीच्या जवळ वीज पडल्याने लोहारा शहरासह १२ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर रात्री ९.५० च्या दरम्यान वीजपुरवठा सुरळीत झाला.
मंगळवारी (दि. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास मार्डी परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसा दरम्यान उजनी येथून लोहाऱ्याला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीच्या परिसरात वीज पडल्याने लोहारा शहरासह १२ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. सायंकाळी ५.३० च्या दरम्यान दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. लोहारा तालुक्यातील मार्डी ते करजखेडा दरम्यान पोलवरील इन्सुलेटर चेक करून रात्री ९.४५ पर्यंत तीन पोलवरील इन्सुलेटर बदलण्यात आले होते. त्यानंतर वीजपुरवठा सुरू करून चाचणी घेऊन काहीही अडचण आली नाही तर वीजपुरवठा सुरळीत होईल अन्यथा काही अडचण आली तर पुढील उर्वरित पोलवरील इन्सुलेटर चेक करावे लागणार आहे अशी माहिती उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली. यावेळी सहाय्यक अभियंता राम दिक्षित, गौरव मुंडे, अविनाश हालसे, कुणाल अंबिलकर यांच्यासह कर्मचारी सुरेश पवार, नासिर शेख, जावेद शेख, अनिल गुंड, देविदास बोंबले, संतोष उदारे, अजमेर शेख आदी रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम करत होते. त्यानंतर ९.५० च्या दरम्यान वीजपुरवठा सुरळीत झाला.

Ad 2
Ad 1
Tags: दुरुस्तीवीजपुरवठा खंडित
Previous Post

दक्षिण जेवळी येथील युवकांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे

Next Post

कोण होणार काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष ? दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात आज मतमोजणी

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

कोण होणार काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष ? दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात आज मतमोजणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!