वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मंगलमय दिवस म्हणजे ६ जून १६७४. याच दिनी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि राजे ‘छत्रपती’ झाले. आजपासून दरवर्षी ६ जून हा दिवस शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. रविवारी (दि.६) उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण बसवराज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, उमरगा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अँड.सुभाष राजोळे, नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे, अल्पसंख्याकचे अध्यक्ष याकूब लादाफ, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर पवार, अतिक मुन्शी, विजय दळगडे, पप्पू सगर, नगरसेवक महेश मशाळकर, विक्रम मस्के, परमेश्वर टोपगे, डींगबर औरादे, बाबा मस्के, सोहेल इनामदार, अंकिता वडजे, आयुब जमादार, व्यंकट पवार, जीवन सरपे, चदु मजगे, बालाजी पवार, शरणाप्पा येलापुरे आदी उपस्थित होते.
No Result
View All Result
error: Content is protected !!