वार्तादूत – डिजिटल न्यूज नेटवर्क
माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ लोहारा तालुका शिवसेनेने गुरूवारी (दि.२२) सकाळी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रामदास कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर पुतळ्याचे दहन केले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घषणाबाजी केली.
यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, रघुवीर घोडके, महेबुब गवंडी, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, महेबूब फकीर, महम्मद हिप्परगे, बालाजी सूर्यवंशी, बालाजी माशाळकर, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, कुंडलिक सूर्यवंशी, पवन मोरे, चेतन गोरे, महेश बिराजदार, विशाल कोकणे, प्रेम लांडगे, अनिल मोरे, संभाजी मुळे, ज्ञानेश्वर गाढवे, संतोष शेवाळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.