वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हराळी येथील गेल्या वर्षी फुटलेल्या बांध बंधीस्ती व ओढा रुंदीकरणाच्या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी यांनी त्यांची जेसीबी मशीन मोफत उपलब्ध करून दिली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या पावसादरम्यान तालुक्यातील हराळी येथील अनेक बंधाऱ्याचे नुकसान झाले होते. या कामासाठी हराळी येथीलच सामाजिक कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी यांनी त्यांची जेसीबी मशीन मोफत उपलब्ध करून दिली आहे. तसेच ओढा रुंदीकरणाचे कामेही करण्यात येत आहेत. या कामासाठी जेसीबी मशिन करिता लागणारे डिझेल शेतकरी उपलब्ध करून देत आहेत. सध्या हराळी व परिसरात ही कामे सुरू आहेत. सध्याच्या पर्जन्यमानाची अनियमितता व अनिश्चितता या कारणांमुळे कमी वेळेत जास्त तीव्रतेचा पाऊस पडत आहे. त्यामुळे बांध फुटून पाणी वाहून जात आहे व जमिनीची सुपीकता ही कमी होत आहे, माती वाहून जात आहे. या सर्व कारणांमुळे बांध बंधीस्तीची कामे होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना जलसंधारणाची कामे करायची असेल त्यासाठी जेसीबी मशिन मोफत उपलब्ध करून दिली जाईल असे आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते. हराळी व परिसरात सुरू असलेल्या या कामाची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडून सामाजिक कार्यकर्ते सचिन सुर्यवंशी यांचे कौतुक केले जात आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!