वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी – रक्षाचे स्मारक, क्रान्ती परिसर येथे भव्य स्मारक उभे करणे या कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि.३१) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवा नेते किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त निवडक अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या सर्वांगीण विकास करणे या हेतूने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक : दवसू २०१६ / प्र.क्र.१५६ / अजाक दिनांक १२ ऑगस्ट २०१६ नुसार मा.मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास करणेसाठी समिती गठीत करण्यात आलेली होती. सदर समितीची बैठक होऊन आमदार ज्ञानराज चौगुले, विधानसभा सदस्य, उमरगा – लोहारा यांच्या शिफारशीने सालेगाव या गावाची निवड करण्यात आलेली होती. तसेच सालेगाव येथे युगप्रवर्तक चैत्यविहार, बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी – रक्षाचे स्मारक, क्रांती परिसर येथे भव्य स्मारक उभे करण्यासाठी मंजुरी व निधी मिळणेबाबत पत्राद्वारे मागणी केली होती. यानुसार या कामासाठी ५ कोटी ९४ लाख १८ हजार ३७७ इतका निधी मंजूर झाला होता. या भव्य स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी युवा नेते किरण गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता किशोर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, बाबुराव शहापुरे, विलास भगत, संजय रणखांब, व्यंकट बदुरे, प्रवीण गोरे, स्वप्नील चव्हाण, मुरली पाटील, विजयकुमार भालेराव, अविनाश भालेराव, अण्णासत्व भालेराव, आविष्कार भालेराव, रोहित भालेराव आदी उपस्थित होते.
No Result
View All Result
error: Content is protected !!