Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

हिप्परगा (रवा) येथे मराठवाडा मुक्तीदिन स्मृती वाचनालयाचा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ – आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने सुरू केले वाचनालय

admin by admin
17/09/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेचे शताब्दी वर्ष व ७५ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. १७) स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय, हिप्परगा (रवा) येथे ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उमरगा या संस्थेच्या वतीने मराठवाडा मुक्तीदिन स्मृती वाचनालयाचा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार तथा ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानराज चौगुले हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी येथील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर वाचनालयाचा फीत कापून शुभारंभ करण्यात आला. या वाचनालयात साहित्यिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भविष्यात याठिकाणी भव्य असे वाचनालय उभे करून त्यातुन मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा संपूर्ण इतिहास व या लढ्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेचे महत्व याबाबतची सखोल माहिती लोकांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले. हैदराबाद मुक्तिसंग्राम पुस्तकाचे लेखक कै. वसंतराव पोतदार यांच्या पत्नी सुशिलाबाई वसंतराव पोतदार यांच्यासह श्रीधर गोपाल देशमुख सातप्पा होनाळकर, रूक्‍मीनबाई पंढरी मुळे आदींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी युवानेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी सोपान अकिले, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, अविनाश माळी, श्रीकांत भरारे, सरपंच राम मोरे, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत लोमटे, मुख्याध्यापक एस.बी. भोईटे, चेअरमन संतोष गवळी, तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव जाधव, धर्मवीर जाधव, विजय पवार, रुक्‍मीनबाई होनाळकर, ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे विजय वडदरे, प्रदीप मदने, बी.के. पवार, नामदेव लोभे, जगन पाटील, सलीम शेख, महेबूब गवंडी, जगदीश लांडगे, अभिमान खराडे, शाम नारायणकर, भरत सुतार, प्रेम लांडगे, शिवा सुतार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
Previous Post

लोहारा खुर्द येथे सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण – ५०० वृक्ष लागवड करण्याचा संस्थेचा संकल्प

Next Post

आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार – राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे यांचाही सत्कार

Related Posts

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
Next Post

आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार - राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे यांचाही सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's