वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
प्राईड इंडिया स्पर्शच्या वतीने १२६ गावामध्ये हळदी कुंकू समारंभास सुरुवात झाली. कोव्हीडचे नियम पाळून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातील मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. लोहारा तालुक्यातील वडगाववाडी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले की कटुता विसरून आपापसात गोडी निर्माण करण्याचा उत्सव म्हणजे मकरसंक्राती. गावागावात हळदी कुंकवाचे समारंभ आयोजित होतात. मात्र आपल्यातून अजूनही कोव्हीड-१९ आजार गेलेला नाही. त्यामुळे नियमित मास्क, हाताची स्वच्छता, सुरक्षित अंतर आणि लस ही चतुसूत्री आपल्या जिवनात अंगिकरण्याची गरज आहे. या उत्सवाच्या माध्यमातून गावातील १०० टक्के महिलाचे सक्षमीकरण आणि सुरक्षित आरोग्यासाठी आवश्यक गोष्टींचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. सानिका बादुले या युवतीने ग्रामीण महिलांचा सर्वच क्षेत्राततला सहभाग वाढला पाहिजे असे मत व्यक्त केले.त्यानंतर स्पर्शच्या टिमने उपस्थित महिलांसाठी संगीत खुर्ची, उखाण्याच्या स्पर्धा इ. मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक स्पर्धाचे आयोजन केले होते. विजेत्या महिलांना स्टीलचा हंडा व कढई भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमासाठी अच्युत आदटराव, सरपंच वनमाला भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया गिराम, डॉ. युवराज हाके, सुपरवायझर पल्लवी औटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अंजुम इनामदार, पूनम राजपूत (स्टाफ नर्स), महेश पांचाळ (फार्मासिस्ट), मनोहर माळी, श्रीमती चंद्रकला बादुले (आशा कार्यकर्ती) आदींसह महिला उपस्थित होत्या.