Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अतिक्रमित शेतरस्ते मोकळे करुन त्याची गाव नकाशावर व अधिकार अभिलेखात नोंद घ्या : जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे

admin by admin
03/02/2023
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

उस्मानाबाद :- सामान्य जनता, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या दैनं‍दिन कामकाज तसेच विविध समस्याच्या संदर्भात प्रत्यक्ष भेटीत आणि निवेदनाद्वारे प्राप्त होणारे बहुतांश समस्या या शेतरस्त्यांसंदर्भात येतात. शेतरस्त्याच्या समस्येमुळे अनेक वाद उत्पन्न होतात.
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये तहसीलदार यांना नवीन रस्ता बांधावरुन देण्याचे अधिकार आहेत. तसेच गाव नकाशा नोंद असलेले शिवरस्ते, पाणंद रस्ते, वहिवाटीच्या रस्त्यांची अडवणूक केली असल्यास मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 कलम 5 नुसार तहसीलदार यांना रस्ता मोकळा करुन देण्याचे अधिकार आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात मागील 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर महाराजस्व अभियानांतर्गत आणि शेतरस्ते अदालतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतरस्ते मोकळे करणे आणि शेत रस्ता उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांना कलम 143 अन्वये नवीन शेत रस्ता देण्याचे आदेश तहसीलदार यांच्या मार्फत निर्गमित केले आहेत. तथापि, वारंवार रस्त्याची प्रकरणे उद्भवत असल्याची बाब शेतकऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या विविध निवेदनाद्वारे होत असल्याचे दिसून येते. यावर कायमस्वरुपी उपाययोजना होणे आवश्यक असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 अन्वये दिलेल्या आदेशाची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्याचे आदेशित केले आहे.
शेतकऱ्यांना रस्ता देण्यासाठी जो आदेश पारित केला आहे त्यात नमूद सर्व सर्व्हे नंबर किंवा गट नंबरच्या इतर अधिकारात रस्त्याच्या हक्काबाबतची नोंद घेण्यात येईल. जेणे करुन रस्त्याच्या आदेशास कायम स्वरुपी कायदेशीर स्थान प्राप्त होईल.
जिल्ह्यातील सर्व जनतेने आणि शेतकऱ्यांनी शेतरस्त्यांच्या अनुषंगाने तहसीलदार यांनी काढलेल्या आदेशाची नोंद 7/12 इतर अधिकारावर घेण्या विषयीचे अर्ज संबंधित तहसीलदारांकडे सादर करावे जेणेकरुन मोहीम स्वरुपात शेत रस्त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारावर घेणे शक्य होईल.
रस्त्याची नोंद 7/12 वर आल्यास महाराजस्व अभियानांतर्गत गाव नकाशावर रस्त्याची नोंद घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी कळविले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाधिकारी सचिन ओंबासे
Previous Post

लोहारा येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

Next Post

लोहारा शहरासाठी निम्न तेरणा धरणातून पाणी आरक्षण मंजूर – आ. ज्ञानराज चौगुले यांची माहिती

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

लोहारा शहरासाठी निम्न तेरणा धरणातून पाणी आरक्षण मंजूर - आ. ज्ञानराज चौगुले यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's