Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार ज्ञानराज चौगुले – शनिवारी रात्री येनेगुर येथे राष्ट्रीय महामार्गावर झाला होता अपघात

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे शनिवारी (दि.११) रात्री राष्ट्रीय महामार्गावर एका इर्टीगा गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने ही गाडी समोरील एका बलेनो गाडीवर जाऊन आदळली. यामुळे या ठिकाणी काही वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याच दरम्यान आमदार ज्ञानराज चौगुले हे त्यांचा जेवळी येथील कार्यक्रम आटोपून उमरग्याकडे येत असताना त्या ठिकाणी झालेली गर्दी पाहून त्यांनी आपली गाडी थांबवली.\"\"आमदार चौगुले यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली असता एका गाडीत कर्नाटक राज्यातील हुमनाबाद तालुक्यातील हळीकडे या गावातील एक कुटुंब त्यांच्या एका व्यक्तीला सोलापूर येथील वळसंगकर हॉस्पिटल मध्ये मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्याने त्याचा डिस्चार्ज घेऊन गावाकडे परतत होते. दुसऱ्या गाडीत एक आजी त्यांच्या दोन नातवासह धार्मिक कार्यक्रमासाठी हुमनाबाद येथे जात होते. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रसंगावधान राखून येणेगुर येथील शिवसैनिकांची एक गाडी आणायला सांगितली व रुग्ण असलेल्या गाडीतील संपूर्ण कुटुंबियांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था केली व मेकॅनिक बोलवुन दुसरी गाडी तात्पुरती दुरुस्ती करून देऊन त्या कुटुंबीयांनाही जाण्याची व्यवस्था केली. या सर्व परिस्थितीची माहिती मुरूम पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक माळी यांना दिली. वाहनांच्या विमा संदर्भात सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यास सर्वतोपरी मदत करणेबाबत सूचनाही केल्या. याप्रसंगी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शेखर मुदकण्णा, दिलीप येडगे, प्रभाकर येडगे, अशोक बनसोडे, हफीसाब मकानदार, श्रीशैल टोणपे, गणेश माळी, अजगर पांढरे, अविनाश माळी, महेश स्वामी, शिवाजी येडगे, विश्वराज बिराजदार, खंडू कांबळे, येणेगुर पोलीस चौकीचे यशवंत सागर, महबूब शेख व इतर ग्रामस्थ धावून आले.

Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुले
Previous Post

औसा शहराच्या विकासाची कामे दर्जेदार करण्यावर भर द्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार – औसा नगर परिषदेअंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम संपन्न

Next Post

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार ज्ञानराज चौगुले – येणेगुर येथे शनिवारी रात्री झाला होता अपघात

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार ज्ञानराज चौगुले - येणेगुर येथे शनिवारी रात्री झाला होता अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!