Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

आधुनिक \’श्रावणबाळ\’ : ३२ वृद्धांना मिळतोय आधार – लोखंडे महाराज बनले निराधारांचे आश्रयदाता – वयाच्या सत्तरीत चालवतात वृद्धाश्रम

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ज्याआधुनिक \’श्रावणबाळ\’ : ३२ वृद्धांना मिळतोय आधार आईवडिलांनी हाताचा पाळणा करून वाढवलं, आजारपणात रात्र-रात्र जागरणं केली, स्वत: काटकसरीने जगून, वेळप्रसंगी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन शिकवलं, लहानाचं मोठं केलं, त्या आईवडिलांची जबाबदारी काही मुलं घेत नाहीत. सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वजण इतके व्यतीत आहेत की, त्यांना घरातील वृद्धांना द्यायला वेळच शिल्लक नाही. त्यांची रवानगी वृद्धश्रमात करतात. अशा एकाकी आणि निराधार जीवन जगणार्‍या लोकांसाठी एक सत्तर वर्षीय सद्गृहस्थ वृद्धाश्रम चालवतात.

\"\"

ही कहाणी आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातल्या नळी वडगावच्या गहिनाथ दगडू लोखंडे महाराज या  आश्रयदात्यांची. शिक्षण केवळ तिसरीपर्यंतचे. चपल शिवणे, गवंडीकाम, टेलरिंग अाणि ड्रायव्हर अशी मिळेल ते काम करून त्यांनी आयुष्य काढलं. २०१३ गहिनीनाथ महाराज हे केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेला गेले आणि अचानक महाप्रलय आला आणि त्यातून ते सुखरूप बचावले. त्या वेळची घडलेली घटना ही त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण देणारी ठरली. जवळून मृत्यू पाहिलेल्या गहिनीनाथ महाराजांनी उर्वरित आयुष्य हे समाजसेवेसाठी खर्च करायचा असा निश्चय केला.
२०१३ साली श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ नावाचे वृद्धाश्रम सुरू केले. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय गायरान जमिनीवर हे वृद्धाश्रम उभे केले. पत्र्याचे शेड आणि कुडाच्या घरात हे आश्रम चालते. सुरुवातीला ३ वृध्द माणसापासून सुरू केलेल्या या आश्रमात आज ३२ लोक राहतात. यात १३ महिला तर १९ पुरुष आहेत. यातील बहुतांश लोक हे निराधार आहेत. गावोगावी फिरून भिक्षा मागून या वृद्ध लोकांचा सांभाळ गहिनीनाथ महाराज स्वतः करतात. याकामी त्यांच्या साठ वर्षीय पत्नी कौंताबाई लोखंडे मोलाची साथ देते. सर्व लोकांच्या स्वयंपाकाची ते व्यवस्था करतात.
गहिनीनाथ महाराज रोज पहाटे पाच वाजता उठतात. वृद्धांना आंघोळ घालतात. सकाळी सात वाजता हरिपाठाने आश्रमाची सुरूवात होते. सर्वांना सकाळची न्याहारी देऊन गहिनीनाथ महाराज आश्रम चालवण्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्य घेण्यासाठी बाहेर पडतात. महिन्यातून एकदा सर्व वृद्धांची आरोग्य तपासणी केली जाते. या आरोग्य तपासणीसाठी गावालगतचे काही डॉक्टर मोफत वैद्यकीय सेवा देतात.  महाराजांच्या या कार्याची महती आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वदूर पोहचत आहे त्यामुळे त्यांना लोकांकडून मदत देखील मिळतेय. त्यातून आश्रम चालवण्यास हातभार लागतोय.

वृद्धांना आधाराची गरज 

कामानिमित्त मुले घर सोडून दुरवर जाऊन नोकरी किवा व्यवसाय करतात आणि पर्यायाने घरातील वृद्ध व्यक्तींना मग वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. वृद्ध लोकांना यामुळे मानसिक व सामाजिक आनंद उपभोगता येत नाही आणि मनातील खंतही व्यक्त करता येत नाही. उतार वयात जेंव्हा खऱ्या अर्थाने आधाराची गरज असते, त्याच वेळी निराधार होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवते. हीच गरज ओळखून आणि केदारनाथचा महाप्रलयातून बोध घेत हे वृद्धाश्रम सुरू केले आहे.
संपर्क – 7350523364
मदतीसाठी बँक डिटेल्स महाराष्ट्र बँक खाते क्रमांक – 80030458935
IFSC MAHG0004423

गहिनीनाथ दगडू लोखंडे महाराज
समाजसेवक

Ad 2
Ad 1
Tags: आधुनिक श्रावणबाळवृद्धाश्रम
Previous Post

तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला कारखानास्थळी – ढोकीतील सर्व बाजारपेठा बंद

Next Post

आता सरकारी रुग्णालयात मिळणार मोफत लस – १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठांच्या लसीकरणाला सुरुवात

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

आता सरकारी रुग्णालयात मिळणार मोफत लस - १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठांच्या लसीकरणाला सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!