वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा कार्यशाळा घेण्यात आली.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना “करिअर कट्टा ” या उपक्रमांतर्गत आय.ए.एस.आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला अंतर्गत कार्यशाळा घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य कवलजीत बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशवंत शितोळे म्हणाले की, विद्यार्थ्यांची प्रत्येक संकटाना सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे. संकटाना संपवून टाकण्याची तयारी ठेवा. तसेच विविध नवीन शिक्षण पद्धतीच्या अवलंब करून घेतला पाहिजे. मोबाइलचा अति प्रमाणात वापर करू नये असे आवाहन करत बौद्धिक संपत्ती अधिकार याविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील बारकावे शोधून त्यातील प्रत्येक भागाचे चिंतन करायलाच हवे. व्यक्तीमत्व विकास, संवाद कौशल्य, मुलाखतीस सामोरे कसे जावे याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. संगमेश मंठाळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पुजा भावे यांनी आभार मानले. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. संजय अस्वले यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रा. प्रदिप डिग्गे, प्रा. शैलेंद्र घुले, प्रा. दीपाली भगत, प्रा. स्नेहल चनशेट्टी, प्रा. प्रिती शिंदे, अभिजित माने, सुहास गायकवाड यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.