वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथील समाज विकास संस्था आणि ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा तालुक्यातील भजनी मंडळाचे अभंग गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम दिनांक २ एप्रिल रोजी समाज विकास संस्थेच्या वात्सल्य सांस्कृतिक सभागृह मध्ये आयोजन करण्यात आलेला आहे. सहभागी गायक वादक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच ज्यांनी वयाची पन्नास साठ वर्षे आयुष्यभर प्रवचन, कीर्तन, गायन, वादन असे उपक्रम घेऊन जनजागृती केलेली आहे.
अशांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात
धोंडीराम पाटील कोरेगाव, अशोक राचुट्टे सास्तुर, अभय रेणके उमरगा, ह-भ-प काकासाहेब महाराज उस्मानाबाद, दयानंद पाटील उमरगा, सुनील माने उमरगा, कृष्णाबाई बाबुराव माचे उमरगा, अशोक स्वामी उमरगा, बब्रुवान सूर्यवंशी उमरगा, दर्शन सूरवसे उमरगा या अकरा विशेष व्यक्तींना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तालुक्यातील भजनी मंडळ त्यांनी खालील नंबर वरती आपल्या मंडळाची नोंद करावी. एका मंडळातील फक्त दहा लोकांना या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवता येईल. हा कार्यक्रम दोन तारखेला दुपारी दोन वाजता सुरू होईल आणि सायंकाळी सहा वाजता समाप्त होईल. प्रमाणपत्र वितरण आमदार ज्ञानराज चौगुले, भूमिपुत्र वाघ, विद्याताई वाघ यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती प्राध्यापक मुरलीधर जाधव, प्राध्यापक भाऊसाहेब उगले, विश्वनाथ महाजन, भागवत फुगटे यांनी दिली आहे.