Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसने केले जोडेमारो आंदोलन – उमरगा येथे सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारत चपलांचा हार घालून महिला, युवकांनी केला निषेध

admin by admin
08/11/2022
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

उमरगा :
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरगा येथील पक्ष कार्यालयासमोर जाहीर निषेध करत मंगळवारी (दि.८) जोडे मारो आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला. खासदार सुप्रियाताई सुळेबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल निषेध केला जात असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्याही आक्रमक झालेल्या पहायला मिळाल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्राचे भूषण आहेत. सलग सात वेळा संसदरत्न पुरस्कार मिळविणार्‍या देशाच्या त्या एकमेव खासदार आहेत. अशा व्यक्तीबद्दल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. येणाऱ्या निवडणूकीत सत्तार यांचा शिवतारे होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी प्रदेश युवक सचिव दिग्विजय शिंदे म्हणाले की, ५० खोक्याचा विषय मोठ्यापासून लहानांपर्यंत चर्चिला जात आहे. कुठे तरी सत्तेची गुर्मी दिसत असून महिलांच्या बाबतीत सत्ताधारी मंत्र्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य केले जात आहे. देशात महिला धोरण राबविण्यात पवार साहेब यांचा पुढाकार होता, त्यामुळे महिलांना आरक्षण मिळाले. त्यांच्याच कन्येबद्दल खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केल्यामुळे सरकारने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा चुकीचे पडसाद उमटून कायदा अन सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील असा इशारा दिला.


राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनिता पावशेरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र महिलांचा आदर करीत आला आहे. कृषीमंत्री सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्रासाठी, आणि महिला भगिनींसाठी निंदनीय असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी तालुकाध्यक्ष संजय पवार, प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनिता पावशेरे, युवक तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, तालुका कार्याध्यक्ष शंतनू (भैय्या ) सगर, युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे, शहराध्यक्ष खाजा मुजावर, सरचिटणीस धीरज बेळंबकर, डॉक्टर सेल शहराध्यक्ष डॉ. फरीद अत्तार, शहर कार्याध्यक्ष फैयाज पठाण, महिला तालुका कार्याध्यक्ष भाग्यश्री रणदिवे, साधना सलगरे, संगीता सलगरे, सविता पवार, कुमार थिटे, रणजीत बिराजदार, प्रभाकर माने, रूपाली सोनकवडे, ईश्वर सोनकवडे, ज्योती राजपूत, रेखा सुरवसे, गीता सुरवसे, सुनंदा रणखांब, राजश्री सूर्यवंशी, विद्या मारकड, आनंद पाटील, गोपाळ घोडके, मंगेश गायकवाड, रोहित शिंदे, अंकुश कांबळे, पिंटु कलशेट्टी आदीसह मोठ्या संख्येने युवक व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कृषीमंत्री अब्दुल सत्तारखासदार सुप्रिया सुळेजिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Previous Post

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Next Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारणे काळाची गरज – डॉ. धनराज माने

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारणे काळाची गरज - डॉ. धनराज माने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's