Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जिल्ह्यातील लॉकडाऊन दीर्घ काळ सुरू न ठेवण्यासाठी जनतेने गर्दी करण्याचे टाळून मास्कचा वापर करावा – जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे जिल्ह्यातील जनतेला आवाहन

admin by admin
22/03/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन मंगल कार्यालय, उपहार गृह आणि इतर गर्दीच्या ठिकाणी निर्बंध आणणे गरजेचे होते. त्याबरोबरच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने कर्फ्यूची वेळ वाढवणे आवश्यक होते. यामुळे व्यापाऱ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे, ही बाब खरी आहे. मात्र प्रशासनाचा प्रयत्न संपूर्ण लॉक डाऊन टाळणे हाच आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.
वारंवार सूचना देऊन कारवाई करूनही ५० टक्यांपेक्षा पेक्षा अधिक नागरिक विना मास्क फिरत आहेत. शनिवारी १६० हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नाईलाजाने निर्बंध कडक करावे लागत आहेत. परिस्थिती सुधारल्यास तातडीने कर्फ्युचा वेळ कमी करण्यात येईल.
सध्या प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात रुग्ण संख्या सर्वोच्च असताना जितके ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर, CCC बेड आवश्यक होते त्यापेक्षा अधिक बेड उपलब्ध करून दिले आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी आवश्यकतेनुसार खाजगी रुग्णालयातील बेड आरक्षित केले जातील. मात्र नॉन कोविड रुग्णांसाठी पुरेसे बेड असावेत याचाही प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले. आरटीपीसीआर चाचण्यांची जिल्ह्याची क्षमता ३५० प्रती दिन इतकी आहे. ती वाढवून एक हजार करण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे असे सांगून श्री. दिवेगावकर यांनी
Remedesivir, faviflu इतर औषधांच्या साठ्याचा आढावा घेऊन पुरेशी औषधं उपलब्ध राहतील याची दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती दिली. नागरिकांनी कोविड आजाराचे कोणतेही लक्षण अंगावर काढू नयेत. आपल्यामुळे घरातल्या वडीलधाऱ्या लोकांना संसर्ग होऊ नये याची दक्षता घ्यावी.
पहिल्या टप्प्यात ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्ती आणि सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण जिल्ह्यातील ३३ ठिकाणी सुरू केले आहे असे सांगून जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर म्हणाले, नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता लसीकरणाच्या मोहिमेला प्रतिसाद द्यावा. त्यातून Covid १९ साथीचा मृत्युदर कमी होण्यास मदत होईल.
सध्याच्या परिस्थितीत एकूण रुग्णांच्या ९० टक्के लोक लक्षणे नसलेले आहेत. परंतु १० टक्के रुग्णांना गंभीर लक्षणे दिसतात. त्यामुळे कोणीही अंगावर आजार काढू नये. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर गंभीर रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येतील. ही परिस्थिती उद्भवू नये यासाठीच नागरिकांनी गर्दी करू नये, मास्कचा वापरा करावा असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आवाहनजिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे घरकुल मार्टचे उद्घाटन

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचा गौरव सोहळा संपन्न

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पाणी फाउंडेशनच्या 'सत्यमेव जयते समृद्ध गाव' स्पर्धेचा गौरव सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's