Vartadoot
Monday, August 3, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

‘डेटॉल’ या राष्ट्रीय कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणीच्या कामाची दखल – हँडवॉश बॉटलवर कसबे तडवळेच्या मनीषा वाघमारेचा फोटो – कोरोनाकाळात रुग्णांच्या नातेवाईकांना पोहोचवले होते मोफत डब्बे

admin by admin
12/06/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यातील  कसबे तडवळे या गावच्या रहिवाशी असलेल्या मनीषा वाघमारे या तरूणीने कोरोना काळात रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत डबे पोहोचवले होते. त्यांच्या या कामाची दखल ‘डेटॉल’ या देशातील राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतली आहे. ‘डेटॉल सॅल्यूट्स’ या अभियानाअंतर्गत युवतीचा फोटो त्यांच्या हँडवॉश बॉटलवर छापला आहे. तसेच मनीषाला डेटॉल कंपनीकडून मानपत्रही देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती डेटॉलच्या ट्विटर हॅन्डलवरून प्रसिद्ध करण्यात आली आहे.मनीषा वाघमारे या उच्चशिक्षित तरुणीला समाजकार्याची आवड असल्याने गेल्या वर्षभरापासून ती कोरोना काळात आपली सेवा बजावत आहे. गतवर्षी जागृती ग्रुप पुणे अाणि होप फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांनी पुणे, उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये गरीब लोकांना अन्नधान्याचे कीट वाटप केले. पण यावर्षी तिने कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचे डब्बे पुरविण्याचे काम स्वखर्चातून  हाती घेतले. रोज दिवसभरात दीडशेहून अधिक लोकांना कसबे तडवळे येथून ३० किलोमीटर गाडीवर उस्मानाबाद ला जाऊन शासकीय आणि खाजगी रुग्णालयात जेवणाचे डब्बे पोहोच करत अाहेत.सुरुवातीला त्यांनी अवघ्या शंभर डब्यापासून याची सुरुवात केली. मात्र, त्यांचे काम पाहून अनेक दानशूरांनी त्यांच्या या कार्याला आर्थिक हातभार लावला. त्यामुळे जेवणाचे डब्बे वाढविण्यात आले. वास्तविक पाहता मनीषा वाघमारे यांची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. १६ वर्षांपूर्वी त्यांच्या वडीलांचे छत्र हरवले होते. त्यांच्या आई अंबिका वाघमारे या चप्पल विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे त्यांचा हा व्यवसाय डगमगला आहे. तरीही त्यांनी मागे न हटता अन्नदान करण्याचे काम सुरू ठेवले आहे. या कामात आईसोबत तिच्या दोन बहिणी माया आणि तेजल या देखील सहकार्य करत असतात.मनीषाच्या याच कामाची दखल डेटॉल या राष्ट्रीय कंपनीने घेत डेटॉल हँडवॉश उत्पादनावर ‘डेटॉल सॅल्यूट्स’ या शीर्षकाखाली मनीषाच्या फोटोसह तिने केलेल्या कामाची माहिती छापली आहे. मनीषा ही पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. भविष्यात तिला अधिकारी व्हायचं आहे. पुण्यातील तिचे काही मित्रमैत्रिणी हे सामाजिक कार्यात योगदान देत असतात. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत मनीषाला समाजकार्याची आवड निर्माण झाली. संकटांना आणि परिस्थितीवर मात करत समाजकार्य करणार्‍या तिच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.———————
आईच्या संकल्पनेमधून आम्ही हा अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला आहे. सुरुवातीला आम्ही स्व:खर्चातून हा उपक्रम सुरू केला. आमच्या कार्याची माहिती दानशूरापर्यंत पोहचली. त्यांनी आर्थिक सहकार्य करण्यास सुरूवात केली. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना जेवणाचे डब्बे पुरविलो. याच कामाची दखल डेटॉल या राष्ट्रीय पातळीवर कंपनीने घेतली आहे. ही माझ्यासाठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. यापुढे देखील माझे काम सुरूच राहणार आहे. —-  मनीषा वाघमारे,

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उस्मानाबाद
Previous Post

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात वर्धापनदिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार – राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त घेतला कार्यक्रम

Next Post

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ – अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Related Posts

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ
आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

02/08/2026
प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
Next Post

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ - अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's