वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
घरगुती गॅससह, पेट्रोल, डिझेलचे दर गगणाला भिडले असल्याने याविरोधात उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेच्या माहितीसंदर्भात लावण्यात आलेले फलक व घोषणा देत गुरूवारी (दि. २१) हुतात्मा स्मारकापासुन तहसील कार्यालयापर्यंत दुचाकी ओढत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर इंधन दरवाढीचा निषेध करीत दुचाकी फेरी काढून इंधन दरवाढीचा निषेध केला. तसेच २०१४ सालीची जुनी नरेंद्र मोदी यांनी केलेली फसवी भाषणे वाजवुन उपरोधात्मक घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकार देशातील सामान्य जनतेची फसवणूक करत असून वेळोवेळी इंधन दरवाढ करत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या फसव्या योजनांची माहिती जगजाहीर करून इंधन दरवाढ कमी न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते दुचाकी वाहनासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य पद्माकरराव हराळकर, तालुकाध्यक्ष संजय पवार, विधानसभा युवक अध्यक्ष बाबा पवार, युवक तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, उपाध्यक्ष प्रताप तपसाळे, विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील, युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे, ग्रंथालय सेलचे जगदीश सुरवसे, उमाकांत पाटील, भैय्या शेख, सरपंच रणजीत गायकवाड, बाबा सोनकांबळे, बाळू बुंदगे, राजकुमार माने, मिर्झा बेग, संजय जाधव, वाघंबर सरवदे, अजित पाटील, नेताजी कवठे, राजू तळीखेडे, फय्याज पठाण, अभय पाटील, ज्ञानदिप सूर्यवंशी, कमलाकर पाटील, बाळू फरताळे, राम सुरवसे, अभिषेक वडदरे, विठ्ठल अंबुलगे, मारुती होगाडे, बाबुराव कुकूर्डे, खंडू काळे, सुरेश वाकडे, माधव नांगरे, भरत देडे, दिलदार मोजीनदर, दिलीप जाधव, पवन पाटील, विष्णू गायकवाड, कृष्णा पांचाळ, राजू तुरोरीकर, राहुल पवार, संभाजी कांबळे, इरफान पटेल, हाजी सय्यद, इस्माईल जमादार, विजय पाटील, व्यंकट बिराजदार, सचिन सुरवसे, प्रभाकर माने, कुमार थिटे, अनिकेत तेलंग, राजाभाऊ तुरोरीकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.