Wednesday, October 28, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

माकणी येथील सिध्देश्वर यात्रा महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा महोत्सवाला बुधवारी  (दि. ७) प्रारंभ होत असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर येथे दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात गुरुवार ( दि. १) पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. दत्त जयंती निमित्त बुधवारपासून सुरु होणाऱ्या या यात्रेची यात्रा कमिटिच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या यात्रे दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी ( दि. ७) सकाळी येथिल विठ्ठल रुक्मीणी मंदिरापासून श्री सिध्देश्वर मंदिरापर्यंत गावातील मुख्य रस्त्याने टाळ मृदंगाच्या गजरात श्री च्या काठीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास काल्याचा कार्यक्रम होणार आहे.

\"सिद्धेश्वर

त्यानंतर गुरुवारी (दि.८) या यात्रा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला कुस्तीचा जंगी फड होणार आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी तालुक्यासह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पुणे आदी ठिकाणाहुन अनेक मल्ल येतात. या कुस्ती स्पर्धेतील अंतिम कुस्तीसाठी १५ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. यासाठी यात्रा कमिटी व गावातील कुस्तीगीराकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मंदिर परिसरात रविवार पासूनच अनेक व्यापा-यांनी दुकाने थाटली आहेत. तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी रहाट पाळणे, मौतका कुआ यासारखे अनेक मनोरंजनाची साधने आली आहेत. याबरोबरच केळी, गृहपयोगी वस्तू, खेळणी, हॉटेल, गिरके आदी व्यापारीही त्यांची दुकाने घेवून मोठ्या संख्येने येतात. ही यात्रा पुर्वीपासून केळीच्या व्यापारासाठी प्रसिध्द आहे. या यात्रेदरम्यान केळीच्या व्यापारातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. यामुळे परिसरातील केळीचे व्यापारी मोठ्या संखेने येतात. या सर्व कार्यक्रमाला भाविक यात्रेकरूंनी उपस्थित रहावे असे आवाहन माकणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Ad 2
Ad 1
Tags: सिद्धेश्वर यात्रा महोत्सव माकणी
Previous Post

जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रसिद्धीप्रमुख पदी रेखा सूर्यवंशी यांची निवड

Next Post

सास्तूर निवासी दिव्यांग शाळेने ३८ पदके मिळवित सलग २० व्या वर्षी पटकावले विजेतेपद

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

Next Post

सास्तूर निवासी दिव्यांग शाळेने ३८ पदके मिळवित सलग २० व्या वर्षी पटकावले विजेतेपद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!