वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व महाविद्यालयाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि.२३) प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. भिलसिंग जाधव, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. सतिश शेळके, डॉ. शीला स्वामी, डॉ. विनायक रासुरे, प्रा. नारायण सोलंकर, काकासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनाची पार्श्वभूमी व इतिहास सविस्तर मांडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सायबण्णा घोडके होते. यावेळी प्रा. डॉ. किरण राजपूत, डॉ. संध्या डांगे, प्रा. मुकूंद धुळेकर, डॉ. नागोराव बोईनवाड, प्रा. सुजित मटकरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतापसिंग राजपूत तर आभार प्रा. डॉ. रवि आळंगे यांनी मानले.