Vartadoot
Sunday, August 2, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त केसरजवळगा ग्रामस्थांकडून सपत्नीक सत्कार

admin by admin
23/08/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
गावातून मिळालेल्या संस्काराच्या बळावरच ३४ वर्षे पोलिस दलात सेवा केल्यानंतर पोलिस निरीक्षक पदावरुन यशस्वीपणे मंचर ता.आंबेगाव जि.पुणे येथून सेवानिवृत्त झालो. गावक-यांनी केलेला सन्मान माझ्यासाठी पाठीवर कौतुकाची थाप आहे असे मत सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी व्यक्त केले. उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे जडीबवलिंगेश्वर मठात रविवारी ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून पुर्ण आहेर देऊन सुधाकर कोरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तत्पुर्वी विरंतेश्वर महास्वामी, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन श्रीमंत भुरे, सरपंच बलभीम पटवारी, मल्लिनाथ बदोले, संजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच मनिषा गावडे गावडेवाडी, वैशाली पोहेकर नागपूर, संजय पोहेकर ता.आंबेगाव जि.पुणे, उपसरपंच गुरबस भुरे, बाबासाहेब डांगे, शब्बीर ईनामदार, मल्लिनाथ स्वामी, श्रीशैल घोडके, पोहेकॉ मल्लिनाथ बंदिछोडे (वळसंग), माजी सरपंच विष्णूपंत पाटील, शेळके प्रशालेचे अध्यक्ष श्रीशैल सैदानरु वागदरी, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अय्युब इनामदार, प्रभाकर हुलगणे, अझरोध्दीन इनामदार , काशिनाथ क्षिरसागर , अभिजीत घाळे, ग्रामसेवक रतनसिंग चव्हाण, योगेश कोडलंगरे, राघवेंद्र पाटील, कपिलेश्वर स्वामी आदी उपस्थित होते.

सुधाकर कोरे यांचे प्राथमिक शिक्षण केसरजवळगा येथे तर माध्यमिक शिक्षण सोलापूर येथील दयानंद महाविद्यालय येथे झाले आहे. वयाच्या २५ व्या वर्षी नागपूर येथे पोलिस दलात शिपाई म्हणुन भरती झाले. यानंतर नोकरी करीत एमपीएससीची परीक्षा देऊन नाशिक येथून पोलिस उपनिरीक्षक पदाची निवड झाली. पहिली पोष्टींग मुंबई येथील जुहू पोलीस ठाण्यात झाली. यानंतर कांदीवली येथे सेवा केल्यानंतर सोलापूर जिल्हयातील वैराग पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणुन रुजू झाले. यानंतर पुणे ग्रामीण पोलिस दलात वाहतुक पोलिस निरीक्षक म्हणुन काम पाहिले. त्यांचे काम पाहून पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील मंचर पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतला. त्यांना येथे केवळ आठ महिने काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी धडाकेबाज काम करीत कमी वेळेतच समाजात लोकप्रिय झाले. त्यांनी बालकांसाठी पोलिस ठाण्यात बालस्नेही केंद्रही सुरु केले. त्यांच्या कार्याचे पोलिस अधिक्षकासह गृहमंत्री वळसे पाटील यांनीही कौतुक केले. त्यांनी मुंबई, पुणे येथे केलेल्या कार्यामुळे त्यांना विविध सामाजिक संस्था व पोलिस दलातर्फे जवळपास दोनशे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ३१ जुलै रोजी मंचर पोलीस ठाण्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा आंबेगाव मंचर येथे चार ठिकाणी सत्कार करुन गौरव करण्यात आला. शांत , शिस्तबद्ध आणि धडाकेबाज अधिकारी म्हणुन त्यांची ओळख या भागात झाली. यावेळी मनिषा गावडे, अय्युब इनामदार, वैशाली पोहेकर, सुधाकर कोरे यांची भाषणे झाली. प्रास्तविक रमेश भुरे यांनी तर सुत्रसंचलन संजय पाटील यांनी केले. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक व पुणे जिल्हयातील मंचर येथील नागरीकही उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापनदिन साजरा

Next Post

कोरेगाववाडी येथे मोफत मधुमेह, रक्तदाब आणि नेत्र तपासणीचे शिबीर – स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या फिरत्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन

Related Posts

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ
आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

02/08/2026
प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
Next Post

कोरेगाववाडी येथे मोफत मधुमेह, रक्तदाब आणि नेत्र तपासणीचे शिबीर - स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या फिरत्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's