वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात ‘ भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात काय कमावलं/गमावलं ‘ या विषयावर २१ व्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी (दि.१४) करण्यात आले. या स्पर्धेत नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाने बाजी मारली आहे.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव हे होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरूळे, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, डॉ. चंद्रकांत बिराजदार आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पवन इंगळे, परिक्षक प्रा. राजाराम निगडे, गुंडू दुधभाते, स्पर्धक मेघराज शेवाळे, राम जाधव आदिंनी मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेतील प्रथम सांघिक पारितोषिक नांदेडच्या यशवंत महाविद्यलयातील साईनाथ महादवाड, नागसेन तुळसे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख दहा हजार रुपये, द्वितीय नांदेडच्या कॉलेज ऑफ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स, बीजेच्या कृष्णा तिडके, नितीन कसबे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व सात हजार रुपये, तृतीय औरंगाबादच्या माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज कुमारी ऐश्वर्या तनपुरे, रामहरी जाधव यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पाच हजार रुपये तर उत्तेजनार्थ वैयक्तीक प्रतिकुल बाजू मुरूमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील कुमारी रुतिका बिराजदार यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व दोन हजार रुपये तर लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयातील अनुकूल बाजू मेघराज शेवाळे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व दोन हजार रुपयाचे बक्षीस देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संयोजन समितीचे प्रा.गोपाळ कुलकर्णी,प्रा.नागनाथ बनसोडे,डॉ.महेश मोटे,डॉ.सुधीर पंचगल्ले,डॉ. रमेश आडे, डॉ. रवी आळंगे, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. संध्या डांगे, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. भिलसिंग जाधव, डॉ. महादेव कलशेट्टी, प्रा.सुजाता मुके आदिंनी पुढाकार घेवून स्पर्धा यशस्वी केली. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. नागोराव बोईनवाड यांनी मानले.