Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील वडगाववाडी येथे उस्मानाबाद जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन – दोन दिवस रंगणार कुस्त्यांचा फड

by admin
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
श्री शिवमल्हार चॅरिटेबल ट्रस्ट भुसणी व मातोश्री कै. विजयाबाई बब्रुवान भुजबळ बहुद्देशीय संस्था लोहारा तालुक्यातील वडगाववाडी येथे उस्मानाबाद जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सलग दोन दिवस कुस्त्यांचा फड रंगणार आहे. अंतिम कुस्ती महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर आणि हरियाणा येथील महान भारत केसरी विजेता प्रविण कुमार यांच्यात होणार आहे. विजेत्या मल्लास एक लाख एकावन्न हजार रुपयांचे पारितोषक देण्यात येणार आहे.
लोहारा तालुक्यातील वडगाववाडी येथील कै. विजया भुजबळ यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग दोन दिवस या स्पर्धा चालणार आहेत. ३५ ते १३० किलो वजन गटातील मल्लांच्या कुस्त्या मॅटवर खेळविल्या जाणार आहेत. दि. ३० ऑक्टोबरपासून या स्पर्धेस सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री बसवराज पाटील, सिध्दराम म्हेत्रे, गहिनीनाथ महाराज औसेकर, जेवळी मठाचे गंगाधर महास्वामी यांच्या उपस्थितीत होणार आहे.\"\"दि. ३१ ऑक्टोबरला स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राचे उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अर्जून पुरस्कार विजेते काका पवार, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते पोलिस उपअधीक्षक राहुल आवारे, मुंबई महापौर केसरी जीवन बिराजदार, कोल्हापूर महापौर केसरी ज्ञानेश्वर गोचडे, महान महाराष्ट्र केसरी दिलीपनाना भरणे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड व राहुल काळभोर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या मल्लास रोख रक्कमेसह तीन किलो तूप, तीन किलो बदाम, चषक, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी दि. ३१ ऑक्टोबर ला हरियाणा येथील महान भारत केसरी विजेता प्रविण कुमार व महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर यांच्यात एक लाख एकावन्न हजाराच्या पारितोषकासाठी कडवी झुंज होणार आहे. परगावाहून आलेल्या मल्लांची राहाण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. या स्पर्धेत मल्लांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पैलवान धनराज भुजबळ, पैलवान रामेश्वर कार्ले यांनी केले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: कुस्ती
Previous Post

दिव्यांगानी पथनाट्यातून केले संवैधानिक नागरी हक्कांबाबत जनजागरण –

Next Post

लोहारा तालुक्यातील वाडीवडगाव येथे जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील वाडीवडगाव येथे जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!