Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यात वेळ अमावस्या साजरी

by admin
in आपला जिल्हा
A A
0

लोहारा –

लोहारा शहरासह तालुक्यात काळ्या आईच्या सन्मानाचा उत्सव असलेला वेळ अमावश्येचा सण मंगळवारी ( दि. १२) पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबियांसह मोजक्याच निमंत्रित मित्र, पाहुण्यांसोबत वनभोजनाचा आस्वाद घेतला.
हा सण शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्वाचा आहे. अगदी सकाळ पासूनच शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांची कुटुंबासह घाई होती. शेतकऱ्यांनी शेतात एक खोप (कोप) तयार करून त्याच ठिकाणी धान्याची आणि मांडलेल्या पांडवांची पूजा करून एका अर्थाने वनराईची भक्तीभावाने पूजा केली. या पुजेसाठी नैवाद्य ही खास असतो. त्यामध्ये , शेंगदाण्याचे लाडू, बोरे, जांभ, हरभऱ्याची ओली भाजी, ताक, लसूण व भाकरीच्या पीठापासून तयार केलेले अंबील, विविध भाज्या एकत्र करून तयार केलेली भज्जी आणि ज्वारी, गहू, बाजरीचे (सजगुर्याचे) उंडे याचा समावेश असतो. गोड पदार्थ म्हणून तिळगुळाची पोळी आणि गव्हाची खीर असते. त्याच प्रमाणे काही ठिकाणी पांढरी ज्वारी सडुन तयार केलेला आंबटभात ही असतो. आंबील वाटीत घेऊन शेतकरी भाऊ-भाऊ , पिता-पुत्र, आजा-नातू आदी पुऱूष पुजेभोवती प्रदिक्षणा घातल्या. यावेळी \”इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे\” असा घोष करण्यात आला. या पुजेचे वैशिष्ठ म्हणजे यात कुठलेच पौरोहीत्य नसतात. उघड्यावरच ज्योत पेटवली जाते. स्वत: बळीराजा ही पूजा करतो.
               पूजा झाल्यानंतर आग्रहाने निमंत्रित केलेल्या मित्र, पाहून्यांच्या जेवणाच्या पंगती बसतात. त्यामुळे मंगळवारी ( दि. १२) तालुक्यातील शेतशिवार माणसांनी फुलून निघाला होता. वेळ अमावस्या निमित्त शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह मित्र परिवार यांच्यासोबत वनभोजनाचा आस्वाद घेतला. वेळ अमावस्या मुळे लोहारा शहरासह तालुक्यात अघोषित संचारबंदी झाल्याची परिस्थिती होती.
——————————————————-\"\"

 

 

\"\"

\"\"

\"\"

\"\"
रानमेव्याचा आस्वाद !

एरवी कधीतरी शेताकडे येणारी सर्व मंडळी या सणानिमित्त शेताकडे जातात. सध्या शेतात हरभरा, गहु, ज्वारी पिक असल्यामुळे त्यांनी ढाळे, वाटान्याच्या शेंगा, ऊस, गव्हाच्या ओम्ब्या यासह बोरं या रान मेव्याचा आस्वाद घेतला. तसेच काही हौसी लोकांनी शेतातील मोहाळाची शिकार करून त्याच्या मधाचा आस्वाद घेतला.
——————————————————-
या दिवशी सायंकाळी कडब्याच्या पेटत्या पेंड्या हातात घेऊन शेतकऱ्यानी आपापल्या शेताला प्रदक्षिणा घातली. यामुळे पिकावर रोगांचा प्रार्दुर्भाव होत नाही अशी धारणा आहे.
——————————————————-
अमावस्या सणाची संस्कृती

मुळ कर्नाटकातील असणारा वेळ अमावास्या हा सण महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. त्यामुळे या दिवशी सर्व जण आवर्जून येतात. व या सणाचा आनंद घेतात.

Ad 2
Ad 1
Tags: वेळअमावस्या
Previous Post

कलदेव निंबाळा येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

Next Post

लोहारा तालुक्यातील खेड गावात चार कावळे मृत अवस्थेत आढळले – गावात भितीचे वातावरण

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

लोहारा तालुक्यातील खेड गावात चार कावळे मृत अवस्थेत आढळले - गावात भितीचे वातावरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!