Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सध्या सुरू असलेली विजबील वसुली तात्काळ थांबवून विजबिलाची रक्कम पीकविमा रकमेतून भरणा करून घ्यावी – लोहारा तालुका भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

admin by admin
01/04/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सध्या चालू असलेली वीज बिल वसुली तात्काळ थांबवून सदर वीजबिल रक्कम खरीप २०२० मध्ये नुकसान झालेल्या पिकांच्या मिळणाऱ्या पिक विमा रकमेतून भरणा करून घ्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन लोहारा तालुका भाजपाच्या वतीने महावितरण कंपनीचे उपअभियंता यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्याचे अर्थकारण पूर्णत: शेतीवर व पर्यायाने पावसावर अवलंबून आहे. २०२० मध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाच्या माध्यमातून नुकसानभरपाई म्हणून देण्यात आलेली अनुदान हे खूप कमी होते. त्यानंतर पिक विमा मिळेल अशी अपेक्षा असताना हक्काच्या पीकविम्यापासून वंचित आहेत. सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याबाबत दि. ५ मार्च रोजी शासनाने पत्र काढले असले तरी प्रत्यक्षात अजून याबाबत कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी आणखीनच अडचणीत आहे. तसेच रब्बी हंगाम २०२० मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे मराठवाड्यातील विविध भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागला. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे हरभरा, ज्वारी, गहु व इतर पिक कांदा, द्राक्ष, आंबा व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारी काळी पडणे, हरभऱ्याला मोड येणे, तसेच द्राक्ष पिकाला अवकाळी पावसामुळे घड पडणे, मनी तडकने, बुरशी निर्माण होणे तसेच आंब्याचा तौर गळून नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महावितरण करून सरसकट वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे पाण्याअभावी प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. यात शेतात असलेल्या जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणकडून २४ तास वीजपुरवठा दिला जात नाही. लोडशेडींग ठेवली जाते. फक्त ८ तास वीजपुरवठा मिळतो आणि तो पण योग्य दाबाने मिळत नसल्यामुळे शेतीसाठी पाण्याचा पुरेसा वापर होत नाही. ट्रांसफार्मर जळाल्यानंतर एक एक महिना दुरुस्त करून दिली जात नाही. त्यात देखील ते दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनाच स्वखर्चाने ने आण करावी लागते. भविष्यातही नुकसानाची सामना करावा लागेल म्हणून विजेची नितांत गरज असल्याने अनेक शेतकरी व्याजाने पैसे काढून वीजबिल भरत आहेत. दिनांक ५ मार्च २०२० ला कृषिमंत्र्यांनी कंपनीला पिक विमा देण्यासाठी सूचना करू असे आश्वासन दिले आणि तसे पत्रक काढल्याचे समजते. परंतु याबाबत अद्याप काहीच झाल्याचे दिसून येत नाही.चेल हे पैसे जमा झाले तर शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी एक प्रकारे मदतच होणार आहे. त्यामुळे आमची शासनाकडे मागणी आहे की, आमच्या हक्काचा पीक विम्याच्या रकमेतून वीजबिल कपात करून घ्यावेत व विज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं.स. सदस्य वामन डावरे, चिटणीस विक्रांत संगशेट्टी, बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, नगरसेवक आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, ओबीसी मोर्चा माजी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, कमलाकर शिरसाट, बालाजी सोनटक्के, प्रमोद पोतदार, बाळु माशाळकर, युवराज जाधव, गोविंद ढोणे, गणेश स्वामी, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पीक विमाभाजपावीज बिल वसुली
Previous Post

राज्यात आज मध्यरात्री पासून जमावबंदी ; मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवीन नियमावली

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी - खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's