Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

सराफ दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव फसला – दुचाकी मेकॅनिकची समयसूचकता आली कामाला

by admin
in क्राईम न्यूज, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील कृष्णा ज्वेलर्समध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरटे सर्व साहित्यासह आले होते. परंतु दुकानाशेजारी असलेल्या दुचाकी मेकॅनिकच्या समयसूचकतेमुळे अज्ञात चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोहारा शहरातील मुख्य चौकातील मातोश्री कॉम्प्लेक्स च्या शेजारी कृष्णा ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने गुरुवारी पहाटे साधारणतः अडीच ते तीन च्या दरम्यान एका कारमधून अज्ञात चोरटे आले होते. जवळपास पाच जण होते. त्यांनी गाडीतून उतरून गॅस कटरच्या साहाय्याने ज्वेलर्स च्या दुकानाचे कुलूप तोडण्यास सुरुवात केली.

\"\"

या ज्वेलर्स च्या शेजारी कृष्णाथ पाटील यांचे दुचाकी दुरुस्तीचे दुकान आहे. या दुकानात स्वतः कृष्णाथ पाटील झोपले होते. झोप येत नसल्याने ते आपला मोबाईल बघत होते. चोरीचा हा प्रकार लक्षात येताच कृष्णाथ पाटील घाबरले होते. तरीही समयसूचकता दाखवत त्यांनी आपल्या मोबाईल वरून १०० नंबर डाईल करून पोलिसांना याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा फोन लागला नाही. त्यानंतर त्यांनी कृष्णा ज्वेलर्स चे मालक यांना फोन केला. परंतु समोर दुकानाच्या समोर तलवार घेऊन एक व्यक्ती थांबला होता. त्यामुळे त्यांना बोलताही येत नव्हते. म्हणून कृष्णाथ पाटील यांनी ज्वेलर्स च्या मालकाला एका पाठोपाठ सहा ते सात वेळा कॉल केला. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे कृष्णा ज्वेलर्स च्या मालकाला लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच आपल्या मोबाईल वर दुकानाचे सीसीटीव्ही ओपन केले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, आपल्या दुकानाच्या गेटसमोर अज्ञात चोरटे गॅस कटरच्या साहाय्याने कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर त्यांनी लागलीच सोबत दोघांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. चौकात आल्यानंतर त्यांनी जोरात ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने आलेले ते अज्ञात चोरटे गाडीत बसून पसार झाले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने ही माहिती ईतर ठिकाणी कळविली व नाकाबंदी करण्यास सांगितले अशी माहिती पोलिसांनी दिली.

\"\"
त्यानंतर लोहारा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक अजित चिंतले, एलसीबीचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, शैलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओव्हळ आदींनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरातील व्यापारी व नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
———-

कृष्णाथ पाटील यांची समयसूचकता

चोरीच्या प्रकारची चाहूल लागताच कृष्णाथ पाटील सुरुवातीला खूप घाबरले होते असे त्यांनी सांगितले. कारण त्यांच्या दुकानासमोर एक चोरटा हातात तलवार घेऊन उभा होता. फोन करून बोलताही येत नव्हते. त्यामुळे त्यांनी ज्वेलर्स च्या मालकास फोन केला. त्यांनी फोन रिसिव्ह केला पण कृष्णाथ पाटील काहीच बोलले नाहीत. त्यानंतर जवळपास सहा ते सात वेळा त्यांनी कॉल केला असल्याचे कृष्णाथ पाटील यांनी सांगितले. त्यानंतर ज्वेलर्सच्या मालकाने दुकानाचे सीसीटीव्ही आपल्या मोबाईल मध्ये ओपन करून बघितले. व हा प्रकार लक्षात आला. कृष्णाथ पाटील यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेमुळेच चोरट्यांचा उद्देश फसला. पाटील यांच्या या समयसूचकतेचे कौतुक होत आहे.
———-

सर्व चौकांमध्ये ऑनलाईन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

लोहारा शहरातील सर्व चौकांमध्ये ऑनलाईन सीसीटीव्ही बसविण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक श्रीनिवास फुलसुंदर यांनी केली आहे. लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा येथील श्रीगिरे हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्सरे चे उदघाटन

Next Post

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!