लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात झाला आहे. शनिवारी (दि.५) दुपारी १२.५० च्या सुमारास हा अपघात झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुलबर्गा येथुन उमरग्याकडे येणारी ट्रक (क्रमांक HR 47 G 1101) ने उमरगा येथून गुलबर्गा रोडने जाणार्या भारत गॅसच्या आटोला जोराची धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने आटो चालकाला बाहेर काढण्यात आले. अनिल भीम सुर्यवंशी (वय 39) राहणार चिंचोली जहागीर असे या चालकाचे नाव आहे. या अपघाताची माहीती मिळताच उमरगा चौरस्ता येथे आहोरात्र अपघातग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले.
