लोहारा तालुक्यातील गोविंद पाटील यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे.
लोहारा तालुक्यातील खेड येथील गोविंद पाटील हे सध्या दस्तापुर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन (ग्रामपंचायत) विभागाच्या वतीने या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त प्रस्तावातून जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक समितीने निवड केली. २०२२-२३ व २०२३-२४ चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर केले आहेत. यात लोहारा तालुक्यातून २०२२-२३ चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार गोविंद पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातून २०२३-२४ चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार राम आलमले यांना जाहीर झाला आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी (दि.७) हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.







