लोहारा (Lohara) शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धाराशिव जिल्हा झोनल आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘धाराशिव जिल्हा झोनल आंतरमहाविद्यालीन क्रीडा स्पर्धा’ घेण्यात आली. यामध्ये ओमकार सगर हा १०० मी. धावणेमध्ये प्रथम क्रमांक, धम्मदीप कांबळे याने थाळीफेक मध्ये प्रथम, अमर जाधव याने भाला फेक मध्ये प्रथम व लांब उडी तृतीय, ओमकार सगर, धम्मदीप कांबळे, अमर जाधव, सौरभ साळुंके, सम्यक सुरवसे ४ ×१०० रिले प्रथम, प्रथमेश पाटील चालणे, सुजाता पवार हिने ८०० मी. रनिंग द्वितीय क्रमांक पटकावला. या सर्व खेळाडूंची ‘विद्यापीठ केंद्रीय झोनल’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे म. शि. प्र. मंडळाचे सचिव आ. सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे, प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या यशस्वी खेळाडूंचे कौतुक होत आहे.








