लोहारा तालुक्यातील जेवळी पंचायत समिती गणात सध्या पंचायत समिती निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. या गणातून जेवळी गावातील युवा कार्यकर्ते रोहित कारभारी हे निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असून पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच असा निर्धार त्यांनी केला आहे.
लोहारा तालुक्यातील जेवळी व परिसरात आरोग्य शिबिर तसेच मोरया गणेश मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, विविध उपक्रम राबविण्यात मोलाचे योगदान रोहित कारभारी यांनी दिले आहे. सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात व समाजकारणात सक्रिय भूमिका असलेले रोहित कारभारी हे या गणात निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टीकडून ते इच्छुक आहेत. युवा चेहरा म्हणून त्यांना मतदारांकडून पसंती मिळेल असा विश्वास त्यांना आहे.









