लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात ‘स्वराज्यजननी’ राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सरपंच भाग्यश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, नितीन देशपांडे, उद्योजक साहेबराव साळुंके, शिपाई बबन बाबर, प्रवीण देशपांडे, कमलाकर देशपांडे, लताताई साळुंके आदीची उपस्थिती होती.






