लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून आलेले तंत्रस्नेही शिक्षक नागेश बंगले यांचा सत्कार शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच प्रभारी मुख्याध्यापक म्हणून एक वर्ष पदभार स्वीकारलेले हरिदास साळुंके यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोईटे, शिवकरवाडी शाळेचे शिक्षक सुधीर घोडके तसेच शाळेतील शिक्षक दत्तू दंडगुले, महादेव कुंभार, नरेंद्र औटे, संभाजी परीट, मनीषा भोजने, पद्मावती देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय भोईटे यांनी मुख्याध्यापक कसा असावा व मुख्याध्यापकांना येणाऱ्या अडचणी व त्यावर कशी मात करावी याविषयी सांगितले. तसेच शाळेसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी तयार आहे असेही सूचित केले.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक नागेश बंगले यांनी सांगितले की, शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू तसेच सर्वांनी शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. सूत्रसंचालन संभाजी परीट यांनी तर महादेव कुंभार यांनी आभार मानले.







