लोहारा शहरातील श्री बसवेश्वर महाराज मंदिरात आयोजित काँग्रेस कमिटीचे नुतन लोहारा तालुकाध्यक्ष दयानंद सुग्रीव पाटील यांचा पदग्रहण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून व उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सोमवारी (दि.१३) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते नानासाहेब पाटील हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, सय्यद खलील, सरफराज काजी, राजाभाऊ शेरखाने, नानाराव भोसले, माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, शामसुंदर तोरकडे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस धाराशिव (ग्रामीण) गणेश पवार, ओबीसी विभाग उमरगा तालुकाध्यक्ष चंद्रकांत जाधव, अॅड. संगमेश्वर माशाळकर, चंद्रकांत साखरे, दादासाहेब गायकवाड, शरणाप्पा शेगजी, अॅड. इरफान जमादार, प्रकाश चव्हाण, सचिन गुरव, राजेंद्र चव्हाण, श्रीधर सांगवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी काँग्रेस कमिटीचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रौफ बागवान, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश होंडराव यांचा पदग्रहण सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बसवराज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन केशव सरवदे यांनी केले. यावेळी आदम शेख, रोहन शिंदे, प्रथमेश शिंदे, महेश चपळे, शंकर माने, ओमकार चौगुले, आसिफ शेख, दिलीप पुंडीपल्ले, मल्लिनाथ बनशेट्टी, गणेश माळी, इस्माईल मुल्ला, राजू स्वामी, गोविंद चपळे, रज्जाक खडीवाले, सरदार फकीर, शेषराव वाघमारे, ओमप्रकाश लोभे, विलास वैरागकर, चंद्रकांत शेवाळे, महेश पांचाळ, उमर शेख, काशिनाथ जट्टे, शरणाप्पा शेगजी, बाबू हेड्डे, परमेश्वर सितापुरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








