Saturday, October 3, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तहसिल कार्यालयासमोर सोमवारी (दि.१७) ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या विविध मागण्या मागील एक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत असल्याचे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या प्रलंबित न्याय मागण्या सोडवणूक न करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्यात यावी या प्रमुख मागणीसह एकूण १७ मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या न्याय मागण्या मागील एक वर्षापासून प्रलंबित आहेत. संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने, प्रत्यक्ष भेटीमध्ये चर्चा होऊन पाठपुरावा करूनही ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. जिल्हा परिषद पंचायत विभाग प्रमुख यांचे कडून संवर्गाचे प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भात कोणतीही सकारात्मक कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात संवर्गामध्ये प्रचंड नाराजी व तीव्र असंतोष दिसून येत आहे. आज आम्ही एकदिवसीय धरणे आंदोलन करत आहोत. परंतु मागण्या मान्य न झाल्यास दि.१८ ऑगस्ट पासून बेमुदत असहकार आंदोलन करणार आहोत. सदरील असहकार आंदोलनामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील व जनतेचे सर्व कामकाज नियमितपणे सज्जावर उपस्थित राहून पूर्ण केली जातील परंतु त्यांची कोणत्याही प्रकारची रिपोर्टिंग पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना करण्यात येणार नाही मासिक व पाक्षिक बैठका पीसी सर्व अभियान यावरती १०० टक्के बहिष्कार असेल तसेच ग्रामपंचायत तपासणीला दत्तराव उपलब्ध करून दिले जाणार नाही परंतु निवडणूक विभागाचे कामकाज नियमितपणे केले जाईल असेही यावेळी सांगण्यात आले.
सन २०२४-२५, २०२५-२६ आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण करण्यात यावेत, १०/२०/३० ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे कालबद्ध पदोन्नती आदेश मिळावेत, प्रलंबित वैद्यकीय बिले मंजूर करावेत, दिव्यांग भत्ता लागू करण्यात यावेत, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने विस्तार अधिकारी रिक्त पदे भरती करण्यात यावे यासह एकूण १७ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. लोहारा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अमोल पाटील यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची आंदोलन स्थळी भेट देत चर्चा केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव जगताप, तालुकाध्यक्ष गोविंद पाटील,
तालुका सचिव गोपाळ करदोरे, आशिष गोरे, एम.के. बनशेट्टी, महादू भिल्ल, गोविंद कोकाटे, साहेबराव मोरे, वैजनाथ चिंचोले, डी. आय. गोरे, धनराज गोरे आदींसह सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

Tags: ग्रामपंचायत अधिकारी संघटनाधरणे आंदोलन
Previous Post

लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन

Next Post

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!