भारत शिक्षण संस्थेच्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील बी.एस.एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी (दि. ४) घेण्यात आला. कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. महेश खरात, अधिष्ठाता, मानव्य विद्याशाखा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर व प्रा. डॉ. नितीन पाटील, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, उप परिसर धाराशिव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ आणि विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पदवी प्रमाणपत्र स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि अभिमानाचे भाव दिसून येत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैभव पतंगे यांनी केले. त्यांनी दीक्षांत समारंभाचे महत्त्व विशद करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. किरण लोमटे यांनी करून दिला.

यावेळी प्रा. डॉ. महेश खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पदवी ही केवळ प्रमाणपत्र नसून ज्ञान, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी महत्त्वपूर्ण पायरी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी ज्ञान व कौशल्याच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करून समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात मोठे होण्यासाठी दिवसा मोठे स्वप्न पहावी आणि स्वप्न साकार होण्यासाठी ध्येयवेडे होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. प्रा. डॉ. नितीन पाटील यांनी उच्च शिक्षण, संशोधन, नवतंत्रज्ञान आणि कौशल्यविकासाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतरही ज्ञानाची भूक कायम ठेवून बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जावे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात अनुग्रह वाचन डॉ. संजय बिराजदार, डॉ. रूपचंद खराडे आणि डॉ. अनिल गाडेकर यांनी केले. यावेळी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. धनंजय माने यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातून मिळालेले ज्ञान, संस्कार, शिस्त आणि मूल्ये जीवनात आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, महाविद्यालयाचे प्रसिद्ध प्रमुख डॉ. अतुल बिराजदार, शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य धनाजी थोरे यांनी केले. डॉ. कल्याण कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. दीक्षांत समारंभामुळे महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी हा दिवस त्यांच्या शैक्षणिक जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरला.







