लोहारा (Lohara) तालुक्यातील मार्डी येथील जिल्हा परिषद शाळेस कानेगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई पाटील यांनी सोमवारी (दि.७) सकाळी अचानकपणे भेट देऊन शाळेची पाहणी केली.
यावेळी उषा ओवांडकर, प्रशांत थोरात उपस्थित होते. या भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई पाटील यांनी वर्गामध्ये जाऊन विद्यार्थी गुणवत्तेची पहाणी केली. शालेय परिसर, शालेय शिस्त, गणवेश, शाळेतील विविध उपक्रम, चौथी सातवी शिष्यवृत्ती, नवोदय, जादा तासिका, सायंकाळी ७ ते ९ या वेळेत प्रत्येक घरातील टीव्ही मोबाईल बंद राहून अभ्यास करता की नाही याबाबत विद्यार्थ्याकडून खात्री करून घेतली. याशिवाय शाळेच्या भौतिक सुविधा, अडीअडचणी व शैक्षणिक अडचणी यांची विचारणा करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शाळेच्या वतीने त्यांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या ज्योतीताई जाधव, सुजाता जाधव, अंजलीताई सरवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप केले. त्यांच्या मनोगतातून त्यांनी गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. शाळेसाठी आवश्यक लागणाऱ्या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ असा मानस व्यक्त केला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वाघमोडे, शिक्षक कैलास माणिकशेटटी, महानंदा चव्हाण, वर्षा चौधरी, युवराज बनकर, रमाकांत खटके, विनोद कांबळे, छायाबाई सूळ आदी उपस्थित होते.







