Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा तालुक्यातील बलसुर येथे कोरोना उपाययोजनेबाबत जि. प. सदस्य प्रा. सुरेश बिराजदार यांनी घेतली बैठक – ग्रामस्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांना केल्या उपाययोजनाबाबत सूचना

admin by admin
23/04/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील बलसुर येथे कोरोना रुग्णाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत उपाययोजना करण्यासाठी शुक्रवारी (दि.२३ ) छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश (दाजी) बिराजदार यांनी ग्रामपंचायत तथा ग्रामस्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांची बैठक घेतली .
बलसुर ग्रामपंचायत अंतर्गत कोरोना संसर्गित असणारे २२ रुग्ण असून कोरोना संसर्गाची वाढती साखळी तोडण्यासाठी सदरील बैठकीत विविध उपाययोजना करण्यात आल्या. यात ज्या संसर्गित रुग्णाच्या घरात वेगळे स्वच्छतागृह नाही अशा रुग्णांसाठी छत्रपती शिवाजी विद्यालयात विलगीकरण कक्ष चालू करण्यात येणार आहे.
बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. संचारबंदी नियमाप्रमाणे सकाळी ७ ते ११ या वेळे व्यतिरिक्त व्यावसायिक केंद्र उघडे ठेवल्यास त्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विना मास्क, विनाकारण फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा व कडक लॉकडाऊनचा निर्णय यावेळी घेण्यात आला.


याव्यतिरिक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत प्रत्येक आशा कार्यकर्तीला ५० घरांची जबाबदारी देण्यात आली असून त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची पल्स ऑक्सीमीटरद्वारे ऑक्सीजन व थर्मल गनद्वारे तापमानाची तपासणी करण्यात येणार आहे. माझे गाव कोरोनामुक्त गाव या मोहिमेअंतर्गत प्रत्येकी ५० घरांना एका शिक्षकाची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याद्वारे कुटुंबांच्या व्यक्तींमध्ये लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून तपासणी करूण घ्यावी व संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवून फवारणी करण्याच्याही सूचना यावेळी प्रा. बिराजदार यांनी दिल्या.
सदरील बैठकीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामसेवक श्री पांढरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गाडेकर, आरोग्य सेविका सोनाली सगर, एमपीडब्ल्यू एस. एस. घंटे, बीट जमादार श्री राठोड, जि प शाळेचे केंद्रप्रमुख श्री. सोमवंशी, ग्रा.पं. सदस्य माधव नांगरे, पवन पाटील, अतुल हिंगमिरे, आयुब पटेल यांच्यासह जिल्हा परिषद व छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील शिक्षक व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारबलसुर
Previous Post

खासदार ओमराजे निंबाळकर यांची नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट – रुग्णालयात आलेल्या रुग्णांची केली विचारपूस – रुग्णालयातील सोयीसुविधा, औषधोपचार याची पाहणी

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथे कोरोना दक्षता समितीची स्थापना – लोकसहभागातून उभारणार आयसोलेशन कक्ष

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथे कोरोना दक्षता समितीची स्थापना - लोकसहभागातून उभारणार आयसोलेशन कक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's