Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

महागाईमुक्त भारत अभियानांतर्गत उमरगा येथे काँग्रेसचे आंदोलन – काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले नेतृत्व

admin by admin
01/04/2022
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार महागाईमुक्त भारत अभियाना अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. १) काँग्रेस भवन उमरगा येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात उमरगा व लोहारा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उमरगा व लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन उमरगा येथे आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सातत्याने महागाईत वाढ करुन सामान्य जनतेची लूट करत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी पराभवाच्या चिंतेने पेट्रोल,डिझेल,LPG गॅस सिलिंडरच्या किंमती सरकारने रोखून धरल्या होत्या. परंतु निवडणुका संपताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसात पेट्रोल, डिझेलमध्ये दररोज ८० पैशाने वाढवत ३.२० रुपयांची वाढ केली तर LPG गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग केला असून तो आता काही ठिकाणी १००० रुपयांच्या वर गेला आहे. यासोबतच CNG आणि PNG गॅसही महाग केला आहे. तसेच खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तुंच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील झाले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महागाईमुक्त भारत’ अभियाना अंतर्गत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील, महाराष्ट्र काॅग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, तालुकाध्यक्ष ॲड. सुभाष राजोळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, किल्लारी कारखान्याचे व्हा. चेअरमन विजयकुमार सोनवणे, विठ्ठलराव बदोले, नानाराव भोसले, विठ्ठलराव पाटील, मा.सभापती मदन पाटील, गोविंद पाटील, युवक काँग्रेस प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, मा.नगराध्यक्षा सौ.प्रेमलता टोपगे, मा.नगरसेवक विक्रम मस्के, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश राठोड, मा. सभापती सचिन पाटील, विठ्ठलराव पाटील, मा.जि.प.सदस्य रफीक तांबोळी, धनराज हिरमुखे, महीला काँग्रेसच्या सौ.संगीता कडगंचे, संगीता पाटील, सुवर्णा भालेराव, तनया कडगंचे, विजय वाघमारे, नगरसेवक दिपक मुळे, ॲड. विरसंगप्पा आळंगे, धनराज हिरमुखे, एम. ओ. पाटील, रशीद शेख, दीपक मुळे, गौस शेख, याकुब लदाप, हरी लोखंडे, विक्रम मस्के, महेश माशाळकर,पप्पू सगर, प्रा.शोकत पटेल, राहुल वाघ, बबन बनसोडे, सुधीर चव्हाण, शिवाजी गायकवाड, परमेश्वर टोपगे, गणेश पाटील आदीसह काॅग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: काँग्रेसकाँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटीलमहागाईमुक्त भारत
Previous Post

लोहारा शहरात १५ विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ – आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून विंधन विहिरी मंजूर

Next Post

कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी लोहारा तालुकास्तरीय समिती स्थापन

Related Posts

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश
उमरगा तालुका

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश

05/04/2025
दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड
उमरगा तालुका

दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

21/01/2025
राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
उमरगा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

14/01/2025
वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे
उमरगा तालुका

वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे

13/01/2025
वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल
आपला जिल्हा

वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल

10/01/2025
Next Post

कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी लोहारा तालुकास्तरीय समिती स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's