वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीचा उद्देश न ठेवता ईतर आवडत्या कोणत्याही क्षेत्रात जावून सकारात्मकता आणि प्रयत्न करत यशस्वी व सर्वश्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करावा. केवळ एमपीएससी, यूपीएससीच्या मागे न लागता कला क्षेत्रासह अनेक विभागातून यश संपादन करता येते. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे आवाहन मुरुम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी.पी. इंगळे यांनी व्यक्त केले.उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा ग्रामपंचायतच्या वतीने सांस्कृतिक सभागृहात आयोजित १० वी १२ वीतील यशस्वी, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनिता पावशेरे होत्या. यावेळी इयत्ता १० वीतील पंकज सुर्यवंशी, गायत्री कारभारी,वैभव स्वामी तर १२ वीतील शुभम कल्याणकर, अंकिता डोणगावे, आकाश कल्याणकर यांच्यासह विशेष प्राविण्य , प्रथम श्रेणीतील ६० गुणवंतांचा गौरव, सत्कार शाल फेटा शैक्षणिक वस्तू देवून पोलीस निरीक्षक पी. पी.इंगळे, सरपंच सुनिता पावशेरे व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच सुनिता पावशेरे यांनी मनोगत व्यक्त करुन सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. शहीद भगतसिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन तुकाराम बिराजदार, तंटामुक्त अध्यक्ष बालाजी पाटील, पोलीस पाटील पा़ंडूरंग पाटील, शहीद भगतसिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद तावशीकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या छाया भालेराव, कृषी सहाय्यक रमेश पाटील, किरण स्वामी, उत्तम सरवदे, माजी मुख्याध्यापक गणपतराव पाटील, गोविंद डोणगावे, विमा प्रतिनिधी संजय घोटमाळे, गुंडू पाटील, बालाजी सूर्यवंशी, नागनाथ बिराजदार, रतन सुर्यवंशी, रमाकांत पावशेरे, भानुदास भांडेकर, परमेश्वर बिराजदार, विष्णू बलसुरे, महेश पाटील, शैलेश पाटील, श्रीमती मते मॅडम, अलका पाटील, लता बलसुरे, पद्मीन डोणगावे, शामल नंदगावे यांच्यासह शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचे आई-वडील, गावातील प्रतिष्ठित, महिला नागरिक, युवक विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी पंकज सुर्यवंशी, शुभम कल्याणकर, अंकिता कल्याणकर यांनी मनोगत व्यक्त करुन ग्रामपंचायतचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मुख्याध्यापक देविदास पावशेरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी बालाजी गुरव, विमा प्रतिनिधी संजय घोटमाळे, कृषी मित्र गहिनीनाथ बिराजदार, विठ्ठल दासमे, अरविंद दळवे यांनी सहकार्य केले.