वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी बालाजी बाबुराव साठे तर व्हाईस चेअरमन पदी शरद अंबादास जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तालुक्यातील माकणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीसाठी गुरुवारी (दि.२१) निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एन. विभूते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी बालाजी बाबुराव साठे तर व्हाईस चेअरमन पदासाठी शरद अंबादास जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एन. विभूते यांनी केली. या बैठकीसाठी संजय चव्हाण, रमेश इंगळे, पांडुरंग बिराजदार, सत्यवान आलमले, आशाबाई ढोणे, भारतबाई जाधव, दत्तात्रय माने, अच्युत साठे, महादेव बंडगर, राम नरसाळे, तात्याराव कांबळे आदी संचालक उपस्थित होते.
निवडीनंतर चेअरमन बालाजी साठे, व्हाईस चेअरमन शरद जाधव यांच्यासह सर्व नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माकणीचे सरपंच विठ्ठल साठे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडित ढोणे, करजगावचे माजी उपसरपंच नागनाथ पवार, शिवाजी पाटील, सचिन ढोणे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन आलमले, भास्कर ढोणे तुकाराम साठे, सरदार मुजावर, गणेश पाटील, विवेकानंद पाटील, गोपाळ ढोणे गोविंद चव्हाण, अप्पाराव जाधव, विनायक कांबळे, बाळू कांबळे, महादेव साठे, प्रेमनाथ साठे, आप्पा पाटील, दिगंबर कदम, अनिल कुलकर्णी, सोसायटीचे सचिव यशवंत कांबळे, सेवक राहुल साठे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.