मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विद्यमान कृषिमंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.८) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्य सरकारमधील एक जबाबदार पदावरील व्यक्ती महिलांविषयी असे वक्तव्य करणे हे निषेधार्ह आहे. त्यामुळे महिलांविषयी पातळीसोडून वाश्चाता करणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. या भूमिकेतून पक्षाच्या शिष्टमंडळाने अब्दुल सत्तार यांना तातडीने बडतर्फ करावे अशी मागणी या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याकडे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल सुभेदार, रुपेश खांडके उपस्थित होते.